शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मंत्र्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा कधी भरून घेणार?, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद विधिमंडळात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:59 AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली.पाटील प्रश्न विचारताना म्हणाले, जे जे काही समाज जीवनात असले पाहिजे ते मंत्रिमंडळातील कोल्हापूरच्या मंत्र्यांकडे आहे. शाळा, कॉलेज, हॉटेल सगळे काही आहे. चांगले आहे. आनंद आहे; पण त्याचा ३० कोटींचा घरफाळा भरलेला नाही.३१ मार्चचे उद्दिष्ट ठेवून महापालिकेचे आयुक्त ३० रुपये, ३०० रुपयांची बाकी असणाऱ्यांना रोज नोटिसा पाठवत आहेत. दंड वगैरे सगळं सुरू आहे; पण ज्यांचे ३० कोटी राहिलेत त्यांच्याबाबतीत मात्र काहीही होत नाही; परंतु या विषयामध्ये एवढ्या मोठ्या रकमेसाठी आयुक्तांनी काहीतरी कारवाई करायला हवी आणि काेल्हापूरच्या जनतेला त्याची माहिती दिली पाहिजे.परवानगीचा प्रश्न न्यायालयातयातील काही इमारतींना परवानगी नाही असेही आहे. याबाबतचे सर्व आक्षेप आपण न्यायालयातच घेणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील