शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

'फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपच संपेल', काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानास कोल्हापुरात उद्यापासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 1:19 PM

संपर्क चांगला असेल तर नेटवर्क तुटत नाही

कोल्हापूर : देशात तीनशे हून अधिक आमदार, खासदारांना फोडत सात राज्यातील सरकार पाडण्याचे काम भाजपने केले. फोडाफोडीचे राजकारण एक दिवस भाजपलाच संपवेल, असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियान जिल्ह्यात ताकदीने राबवण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.काँग्रेसने भारत जोडो यात्रेनंतर देशात ‘हात से हात जोडो’ अभियान हाती घेतले आहे. कोल्हापुरात गुरुवार (दि. २६) पासून सुरुवात होत असून त्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले, जनतेला सरकार घाबरले तर तिथे लोकशाही असते, मात्र सरकारला जनता घाबरु लागली तर तिथे हुकूमशाही असते, देशात सध्या हुकूमशाही सुरु आहे. घटना बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असून त्याला रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढली.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, आमदार पी. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शशांक बावचकर यांनी स्वागत केले. यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर, राजू आवळे, ऋतुराज पाटील, गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण, राहुल पाटील, राहुल खंजीरे आदी उपस्थित होते.२०२४ ची निवडणूक यु ट्यूबचा वापरलोकसभा व विधानसभा २०१९ ची निवडणूक व्हॉट्सॲप भोवती फिरली, या माध्यमाचा भाजपने पुरेपूर वापर करत सत्ता हस्तगत केली. आगामी २०२४ च्या निवडणुकीत यु ट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या तंत्राचा आतापासूनच वापर करावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

संपर्क चांगला असेल तर नेटवर्क तुटत नाहीसंपर्काची रेंज चांगली असेल तर मोबाइलची रेंज तुटत नाही. या अभियानाच्या माध्यमातून लोकांशी चांगला संपर्क ठेवला तर तुमचे नेटवर्क अधिक चांगले होईल असे सांगत ज्या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार नाही, तिथे आपण व आमदार प्रा. जयंत आसगावकर हे अभियानात सहभागी होणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

एप्रिलमध्ये जिल्हा परिषदेचे बिगुलएप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून घराघरात जावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपा