शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संप मिटेपर्यंत भाजपा संपकरी कर्मचाऱ्यांना शिधा पुरवणार - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 7:31 PM

भारतीय जनता पक्षातर्फे धान्य किट वाटप

कोल्हापूर : एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूर विभागातील अडीच हजार कर्मचाऱ्यांची चुल पेटविण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष घेत आहे. अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूरात केली. त्यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानकासमोर आंदोलनस्थळी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना धान्य किट वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, हा संप लवकर मिटावा आणि स्वाभीमानाने कर्मचाऱ्यांनी कामावर जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आल्यापासून हैदोस सुरु आहे. यांचे काही तरी नक्की होणार . अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल. असे साकडे त्यांनी देवीला यानिमित्त घातले. शिधा वाटप झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आश्रू होते. तर काहींनी सरकार आमच्या रक्ताने थंड होणार असेल तर आम्ही रक्त सांडण्यास तयार आहोते. अशी भावना व्यक्त केली. त्यावर पाटील यांनी असे आत्महत्या किंवा हिंसेने हा प्रश्न सुटणार नाही. अशी समजूत काढली. राज्य सरकारची ताठार भूमिका जास्त काळ चालणार नाही. आंदोलन लवकरच संपुष्टात येईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महामंडळच्या जमीनीवर काहींचा डोळा आहे. त्यामुळे मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे. असा आरोपही त्यांनी केला.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, शेतकरी आत्महत्या आणि काल एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली. याची सर्व जबाबदारी म्हणून या मारेकरी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहीजे. अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या हस्ते संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना एक किलो शेगतेल, चटणी, वाटाणा, साखर, हरभरा आदी धान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, गणेश देसाई, कर्मचारी संघटनेचे उत्तम पाटील, निशांत घाटगे, संजय घाटगे आदी उपस्थित होते. राज्यातही हा उपक्रम राबविण्याची सुचना राज्यातील प्रत्येक आगारामध्ये अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी धान्य किट वाटप करावे. जेणेकरून तेथील कर्मचाऱ्यांची चुल पेटेल. याची दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हावार अध्यक्षा देण्यात येईल. असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील