हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथील सहा प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग, गटारी तुंबलेल्या असल्याने दुर्गंधी पसरून साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने भाजपने दिलेल्या निवेदनाकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गावातील सहाही वार्डामध्ये कच-याचे ढीग साचून दुर्गंधी पसरलेली होती. त्याच बरोबर सर्व गटारी तुंबलेने डासांचा प्रादुर्भाव होऊन साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झालेली होती. अशा घटना हेरले ग्रामस्थांच्या जीविताशी धोका निर्माण करणाऱ्या असल्याने भाजप शाखा हेरले यांच्या वतीने हेरले ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायती समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी उपसरपंच सतीश काशिद, राहुल शेटे व संदीप चौगुले यांच्याशी विचार विनिमय करून तीन महिन्यांत मागण्याबाबत निपटारा करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच हा कोरोनाचा काळ असलेने भाजप शाखा हेरलेने फिजिकल डिस्टंन्सचे पालन करून आंदोलन केले.
यावेळी तालुका चिटणीस श्रीकांत पाटील, अध्यक्ष विश्वजित भोसले, ग्रा. पं. सदस्या निलोफर खतीब, उपाध्यक्ष संदीप मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर परमाज, विशाल परमाज, मुनीर जमादार, इब्राहिम खतीब, सुनील खुरपे, हृषीकेश वड्ड, भगवान कलकुटगी, आरिफ मुजावर, यशवंत मोहिते, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.