शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपची गुन्हेगारांनाच पसंती

By admin | Published: October 20, 2015 11:44 PM

विनायक राऊत : भाजप-ताराराणीच्या उमेदवारांवर डागली तोफ; दिशाभूल करणारा वचननामा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी महायुतीच्या जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये अनेकजण गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे जगजाहीर असताना एकही मटकावाला, दारूवाला नाही, असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीने जाहीर केलेला वचननामा हा जनतेची दिशाभूल करणारा व फसवा असल्याची टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने महापालिकेत भ्रष्ट कारभार केला आहे, तर ‘गल्लीपासून दिल्ली’पर्यंत काँग्रेस संपली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर हेही प्रमुख उपस्थित होते.वसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी, ताराराणीला ‘मटका’ चिन्ह मिळणे आवश्यक होते, अशी केलेली बोचरी टीका ताराराणी-महायुतीच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर ‘ताराराणी’चे नेते सुनील कदम यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे उमेदवार दाखविण्याचे आव्हान केले होते. त्याला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, भाजप-ताराराणी महायुतीच्या नेत्यांना आपल्याकडे मटका, दारूवाला नाही हे सांगण्याची वेळ आली आहे. त्यांच्या उमेदवारांच्या यादीत दुधाळी पॅव्हेलियन, राजलक्ष्मीनगर, दौलतनगर, महालक्ष्मी मंदिर या प्रभागातील उमेदवार हे दारू, मटकावालेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांना माहीत नसली तर त्यांनी ती पोलीस खात्याकडून मागवून घ्यावी. त्यांच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा व नगरसेवकांना निवडून आणण्याचा भाजप-ताराराणीचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून, तो यशस्वी होणार नाही. कारण शिवसेनेच्या मागे स्वाभिमानी जनता आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजपसारख्या पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना फक्त आश्वासनांचीच खैरात केली आहे. ‘स्मार्ट सिटी’सह हजारो कोटींचा निधी आणण्याच्या विकासाचे गाजर दाखविले आहे; परंतु ठोस नियोजनाचा अभाव या जाहीरनाम्यात दिसतो, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्ट करभार केल्याची टीका केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर टीका करताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत’ संपलेला आहे. त्याला उभारी घेण्यासाठी किमान पन्नास वर्षांचा कालावधी जावा लागेल. या पत्रकार परिषदेस आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केली यादीच...पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘टोलमुक्ती करणारच’ या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, रस्ते विकास महामंडळाचे मंत्रिपद शिवसेनेकडे असताना टोलमुक्तीची घोषणा करणारे तुम्ही कोण? मटका-दारूवाले आपल्याकडे नाही म्हणणाऱ्या भाजप-ताराराणीचे नेते राजलक्ष्मीनगर प्रभागातील शोभा बामणे यांचे पती दत्तात्रय बामणे मटकावाले, महालक्ष्मी मंदिर प्रभागातील श्रृती पाटील यांचे पिता आर. डी. पाटील हे दारूवाले, दौलतनगर प्रभागातील विलास वास्कर हे मोक्काअंतर्गत कारवाई झालेले, तर दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातील हेमंत कांदेकर हे मारामारीचे गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, अशी उमेदवारांची यादीच आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केली.राष्ट्रवादीचा पालिकेत खेळखंडोबागेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने महापालिकेत खेळखंडोबाच केला आहे. त्यामुळे त्यांना ‘वचननामा’ प्रसिद्ध करण्याचा अधिकारच राहिलेला नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. याशिवाय काँग्रेस संपली असल्याचे सांगताना काँग्रेसला उभारी मिळण्यासाठी पन्नास वर्षांचा कालावधी जावा लागेल, असेही सांगितले.