शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

हद्दवाढीसाठी भाजपचे धरणे आंदोलन

By admin | Published: July 26, 2016 12:06 AM

निर्णयापर्यंत आंदोलन सुरू : महापालिकेचे अस्तित्व धोक्यात येण्याचा इशारा

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ ताबडतोब व्हावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक सहभागी झाले आहेत. हद्दवाढीचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ‘कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे...’, ‘हद्दवाढीचा वादा...पालकमंत्री चंद्रकांतदादा...’ अशा घोषणा देत आंदोलनात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.संदीप देसाई म्हणाले, हद्दवाढ व्हावी ही पक्षाची अधिकृत भूमिका असून, शासनदरबारी याविषयी आग्रही मागणी करण्यात आली आहे. हा विषय प्रखरतेने शासनासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.माजी अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजप सुरुवातीपासूनच कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जागरूक असून, वेळोवेळीआंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेहमीच शहराला भरघोस मदत केलेली आहे. आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, शहराची हद्दवाढ न झाल्यास शहरातील नागरी समस्या आणखी गंभीर बनतील. सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, हद्दवाढीनंतर शहराला विविध माध्यमातून निधी मिळू शकेल. ही शहराच्या सुशोभीकरणासाठी हद्दवाढ उपयुक्त असून, सध्या ती होणे गरजेचे आहे.माजी नगरसेवक आर. डी. पाटील म्हणाले, हद्दवाढ न झाल्याने महापालिकेची सध्याची स्थिती ही बंद पडलेल्या गाडीसारखी झाली आहे. हद्दवाढ झाली नाही तर महापालिकेचे अस्तित्व धोक्यात येईल.यावेळी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नगरसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकारात्मक निर्णय होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आंदोलनात राहुल चिकोडे, संतोष भिवटे, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, सुभाष रामुगडे, नगरसेवक संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, उमा इंगळे, किरण नकाते, सुनंदा मोहिते, शेखर कुसाळे यांच्यासह अ‍ॅड. संपतराव पवार, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, सुरेश जरग, अमोल पालोजी, राजू मोरे, नचिकेत भुर्केे, दिग्विजय कालेकर, सतीश पाटील-घरपणकर, हर्षद कुंभोजकर, वैशाली पसारे, रेखा वालावलकर, भारती जोशी, गणेश देसाई, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)हद्दवाढीचा निर्णय लवकर घ्याआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना दुपारी निवेदन फॅक्स करण्यात आले आहे. हद्दवाढीबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.