कोल्हापूर : कर्जमाफीसह एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल जनमाणसांत तयार झालेल्या नाराजीमुळे जिल्ह्यांतील इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. जे त्या पक्षात जाणार होते ते सावध झाले असून, घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेण्याची त्यांना भीती वाटत आहे. काहींनी तर भाजपचा नाद सोडल्याची स्थिती आहे.
गुजरातच्या निवडणुकीत काय होते याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले असून तिथे निकाल भाजपच्या विरोधात गेल्यास जिल्ह्यातही दोन्ही काँग्रेस पुन्हा उचल खाण्याची चिन्हे आहेत.माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा प्रवेश बारगळलाच आहे. त्यांना स्थानिक राजकारणातून विरोध झालाच शिवाय शेट्टी यांनीही त्यांना त्यापासून परावृत्त केले. खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी त्यांचा भाजपबरोबरचा वावर इतका वाढला होता की पालकमंत्र्यांनी त्यांची उमेदवारीच जाहीर करायची तेवढे बाकी राहिले होते परंतु त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वावर पुन्हा वाढला आहे. चंदगड मतदार संघातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर या देखील पक्षात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या कन्या नंदाताई बाभूळकर या भाजपच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होत्या; परंतु त्यांनीही भाजपकडे वळविलेले पाय मागे घेतले आहेत.
समरजित घाटगे हे विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून जास्तच आक्रमक झाल्यामुळे संजयबाबा घाटगे यांचीही स्थिती दोलायमान झाली आहे. माजी खासदार निवेदिता माने यांचेही भाजप प्रवेशासाठी नाव चर्चेत होते परंतु ती हवाही बसली आहे. धैर्यशील माने यांनी आपण लोकसभा लढवणार परंतु अजून झेंडा ठरलेला नाही, असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचेही नाव भाजपमधून चर्चेत होते परंतु त्यालाही ब्रेक लागला आहे. शिवसेनेचे सहापैकी किमान दोन आमदार भाजपच्या संभाव्य यादीत होते; परंतु बदललेल्या राजकीय स्थितीमुळे त्यांनीही सावध पवित्रा घेतला आहे.
भाजप सत्तेवर आल्यानंतर सत्तेच्या सावलीत जाण्यासाठी अक्षरक्ष: चढाओढ सुरू झाली होती. त्यामध्ये समरजित घाटगे, अरुण इंगवले, अनिल यादव, अशोक स्वामी, अशोक चराटी, राहुल देसाई, अशोकराव माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर आदींचा समावेश होता. त्यातील घाटगे यांना ‘म्हाडा पुणे’चे अध्यक्षपद मिळाले. अशोक स्वामी यांच्या पत्नीस इचलकरंजीचे नगराध्यक्षपद मिळाले. चराटी यांना आजरा कारखान्याची सत्ता मिळाली. इतरांना अजून तरी म्हणावा तसा राजकीय लाभ झालेला नाही.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दर दोन-तीन महिन्यांनी पत्रकार अचंबित होतील, असा नेता भाजपमध्ये येणार असल्याचे सांगत होते; परंतु आता या सगळ्याच घडामोडी थंडावल्या आहेत.वाढत्या नाराजीमुळे त्यांचेही पाय थबकले..राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल शेतकºयांत कमालीची नाराजी आहे. जीएसटी, महागाईपासून जिल्ह्याचे अनेक प्रश्न असे आहेत की त्याबद्दल सरकार बदलले म्हणून फारसा फरक पडलेला नाही. सर्वसामान्य जनतेला जो त्रास, भ्रष्टाचार यापूर्वी सहन करावा लागत होता त्यातही काहीच फरक पडलेला नाही. ‘गुड गव्हर्नन्स’ची हवा झाली. त्याचा कायदाही झाला परंतु प्रत्यक्षात हेलपाटे कमी झालेले नाहीत. शिवसेनेसारखा घटकपक्ष सत्तेत असूनही रोज एक आंदोलन करू लागला आहे. खासदार राजू शेट्टींसारखा नेता महाआघाडीतून बाहेर पडून भाजपवर आक्रमक टीका करू लागला आहे. भाजपसारखा फसवा पक्ष नाही, असा त्यांच्या टीकेचा रोख आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सोशल मीडियावरही भाजप सरकारबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. जनमाणसांतही तीच भावना आहे. यामुळे जे भाजप प्रवेशासाठी रांगा लावून बसले होते त्यांचे पाय थबकले आहेत.नंदाताई बाभूळकर या भाजपच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होत्या; परंतु त्यांनीही भाजपकडे वळविलेले पाय मागे घेतले आहेत.समरजित घाटगे हे विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवारम्हणून जास्तच आक्रमकझाल्यामुळे संजयबाबा घाटगे यांचीही स्थिती दोलायमानझाली आहे.