संदीप बावचे ।जयसिंगपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या बूथ मेळाव्याच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. तर शिरोळच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन खासदार व दहा आमदार भाजपचे असतील, असा दावा केला आहे. या ना त्यानिमित्ताने पालकमंत्र्यांबरोबर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही दौरा तालुक्यात होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप फिल्डींग लावत आहे.
शिरोळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच उल्हास पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेने बाजी मारली. जातीय समीकरणाच्या या तालुक्यात प्रथमच शिवसेनेचा आमदार झाला. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने मोट बांधली होती. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने विकास आघाडीची साथ सोडून नेते वेगवेगळ्या पक्षात स्थिरावले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे अनिल यादव, राष्ट्रवादीचे डॉ. अशोकराव माने, केडीसीसीचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, रामचंद्र डांगे, विजय भोजे अशा मातब्बर नेत्यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतरच खऱ्या अर्थाने भाजपने शिरोळ तालुक्यात राजकीय पेरणी केली.
कागलनंतर शिरोळ तालुक्यातील राजकीय भूकंप आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. आता आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. १ जूनला झालेल्या शिरोळ येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील दोन खासदार व दहा आमदार हे भाजप म्हणतील तेच होतील.याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिरोळचे आमदार उल्हास पाटीलदेखील उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.तालुक्यातील आमदार सक्रिय1 भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील यांनी आगामी विधानसभेचा उमेदवारच जाहीर केला आहे. शिवाय शिरोळचा नगराध्यक्ष व सत्ता भाजपचीच येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले आहे. तर आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजपचा उमेदवार आमदार होण्यासाठी भाजप पक्ष कुठेही कमी पडणार नाही, असे स्पष्ट केले.2 पालकमंत्र्यांबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही शिरोळ तालुका केंद्रीत केला आहे. मंत्री खोत यांनी क्षारपडग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ६० हजारांचे अनुदान शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात या ना त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून व्यूहरचना आखली जात आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी मंत्र्यांच्या दौºयाच्या निमित्ताने होत आहे.शिरोळमध्ये शिवसेनेला आव्हानशिरोळ नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार असल्याचे अनिल यादव यांनी बूथ मेळाव्याच्या निमित्ताने जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार उल्हास पाटील शिवसेनेचा धनुष्य उचलणार की महाआघाडीत सहभागी होणार हे येणाºया निवडणुकीच्या निमित्ताने दिसणार आहे. भाजपने चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे घोषित करुन शिवसेनेला आव्हान दिले आहे.युतीबाबत उत्सुकतासर्वच निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, अशी घोषणा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर वरिष्ठ पातळीवर भाजप व शिवसेनेच्या बैठकाही होत आहेत.असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपकडून थेट विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर शिवसेना-भाजप एकत्र आल्यास आगामी विधानसभेचे चित्र काय असणार, याचीदेखील उत्सुकता आतापासून लागून राहिली आहे.