कोल्हापूर : कोरोना काळात समाजासाठी काम करणाऱ्यांना पुण्यातील होर्डिंग्जवर स्थान देऊन कृतज्ञता व्यक्त करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातही ही मोहीम सुरू केली आहे. शहरात ‘अभिमान कोल्हापूरचा’ या मोहिमेद्वारे अशा कार्यकर्ते, स्वयंसेवकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशा पद्धतीची १६ होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या महिन्यात पुण्यात अभिमान पुण्याचा, हे कृतज्ञतेचे अभियान सुरू झाले. जातपात, धर्म पंथ, राजकारण-पक्ष बाजूला ठेऊन, जूनच्या प्रारंभी सुरू झालेले हे अभियान राज्यभर प्रचंड गाजले. त्याच अभियानाची कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली.
कोरोना काळात ज्यांनी सातत्यपूर्ण लोककल्याणाचे काम केले, लोकांना धीर दिला, त्यांच्या दुःखाचा, वेदनांचा भार कमी केला, त्यांना वंदन म्हणून हे ‘अभिमान कोल्हापूरचा’ हे अभियान आहे.
चौकट
यांच्याविषयी केली कृतज्ञता व्यक्त
रवी जावळे माणुसकी फाउंडेशन इचलकरंजी, जाफरबाबा सय्यद बैतुलमाल कमिटी, ऐश्वर्या मुनीश्वर सेवा निलंमय, हर्षल सुर्वे, प्रिया पाटील भवानी फाउंडेशन, संभाजी साळुंखे सेवा व्रत फाउंडेशन, उमेश यादव घरपाेच अन्नदान, संताजी घोरपडे, डॉ. संगीता निंबाळकर व्हीजन चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. प्रिया दंडगे, शुभांगी थोरात यांच्याकडून वारांगना, तृतीयपंथीयांना मदत, मिलिंद धोंड, जयेश ओसवाल, रॉबिनहूड आर्मी.
२४०६२०२१ कोल बीजेपी ०१