कोल्हापूर : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बुधवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ‘ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘महाविकास आघाडी सरकारच करायचं काय....खाली डोक वर पाय,’ अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
राहुल चिकोडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी इम्पिरिअल डाटा गोळा करण्याला प्राधान्य दिले असते तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचले असते. हा विषय गांभीर्याने न घेतल्याने आरक्षण रद्द झाले. समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप लढा देत राहील.
सरचिटणीस हेमंत आराध्ये, ग्रामीण ओबीसी जिल्हा अध्यक्ष डॉ. आनंद गुरव, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, विजय जाधव यांनी मते मांडली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, संतोष भिवटे, अजित सूर्यवंशी, दिग्विजय कालेकर, प्रदीप उलपे, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश यादव, भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, स्वाती तेली, विद्या तेली, वीणा यादव, प्रिया यादव, राजनंदिनी याद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो नं १५०९२०२१-कोल-बीजेपी निदर्शने
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणप्रश्नी निदर्शने करण्यात आली.
---