शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

भाजपचा शिवाजी चौकात विजयोत्सव

By admin | Published: February 24, 2017 12:12 AM

साखर वाटून आनंद : गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर अपेक्षित यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी कोल्हापुरात शिवाजी चौकात विजयी जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणा देत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले. त्यांनी विजयोत्सवाबद्दल साखर वाटून आनंद साजरा केला.भाजप आघाडीला जिल्हा परिषदेमध्ये अपेक्षित यश मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात शिवाजी चौकात पक्षाच्यावतीने साखर वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. दुपारनंतर भाजप ‘जादुई आकडा’नजीक पोहोचल्याने भाजपचे सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र आले. त्यांनी गुलालाची उधळण करत भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या. फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटून जल्लोष केला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयाची खूण केल्यानंतर समर्थकांनी पुन्हा गुलालाची उधळण करत घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, शेखर जाधव, विजय खाडे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, अ‍ॅड. संपतराव पवार, महेश जाधव, विनय जाधव, सुरेश जरग, सर्जेराव जरग, राजू मोरे, महेश मोरे, रतन बाणदार, हेमंत आराध्ये, नचिकेत भुर्के, संतोष भिवटे, गणेश देसाई, अभिजित कालेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)...अन् दादाही नाचलेकोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता स्थापण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये भाजप मित्रपक्षांची सत्ता स्थापन होण्याची खात्री निर्माण झाल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा गुरुवारी निकालानंतर चांगलेच आनंदी होते. शिवाजी चौकात विजयोत्सवात ढोल-ताशाच्या तालावर भाजपचे कार्यकर्ते नाचत होते. मंत्री चंद्रकांतदादा चौकात पोहोचल्यावर त्यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. तेही ढोल-ताशाच्या ठेक्यावर संघटनमंत्री बाबा देसाई यांच्यासह हात उंचावून काही वेळ नाचले.कार्यालयात उत्साहकोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप कार्यालयात उत्साह दिसून आला. या ठिकाणी निकालाची माहिती घेऊन आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी झाली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यासह राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांची माहिती घेत होते.