सातारा : गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. म्हणूनच जितके नियम तितक्या पळवाटा तयार होतात. सलमानचा नवा पिक्चर येणार आणि ‘ब्लॅक’ करता येत नाही,म्हणजे काय! रोजीरोटीमध्ये आला ‘हायटेक’ अडसर. पण निरक्षरांनी तोही अडसर दूर केलाच अखेर! बऱ्याच दिवसांनी मोठा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चित्रपटगृहाबाहेर आज (शुक्रवारी) मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती. ज्या चित्रपटगृहांमध्ये आज हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यांनी वादविवाद टाळण्यासाठी संपूर्ण तिकीट आॅनलॉईन देण्याचे ठरविले. याची माहिती ब्लॅक करणाऱ्या महिलांना मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. कसलीही अक्षरओळख नसलेल्या या महिला चक्क आॅनलाईन तिकीट खरेदीसाठी सरसावल्या.चित्रपटगृहाच्या बाहेरच असलेल्या आॅनलाइन सेंटरवाल्यांशी साटेलोटे करून या महिलांनी आपल्याकडे अधिकाधिक तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. आॅनलाईन बुकिंगला एकावेळी केवळ पाच तिकिटे मिळतात. या महिलांनी आपल्या ओळखीचे आणि मुलांचे मित्र यांचा मोबाईल नंबर टाकून हे बुकिंग केल्याचे निष्पन्न झाले. अशा पद्धतीने एकेक महिलेकडे कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त तीस तिकिटे उपलब्ध असल्याचे धक्कादायक चित्र चित्रपटगृहाबाहेर दिसले.या ब्लॅक करणाऱ्यांवर वचक बसावा व प्रेक्षकांना निर्धारित दरातच चित्रपट बघता यावा, यासाठी केलेल्या उपाययोजनांना पाने पुसून ब्लॅक करणाऱ्यांनी आता ‘हायटेक’ होणे पसंत केले आहे. त्यामुळे पुढील सप्ताहात आणि विशेषत: शनिवार ते मंगळवार हे दर असेच तेजीत राहणार आहे. असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. पोटापाण्यासाठी असाध्य ते साध्य करणाऱ्यांना दाद द्यावी की तंत्रज्ञानाची कीव करावी, असा प्रश्न उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)मनमानी दराने तिकीट ब्लॅकसलमान खानच्या या बहुचर्चित चित्रपटाचे आकर्षण तरुणाईला मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कितीही किंमत मोजून ‘फर्स्ट डे शो’ बघितला जातो. ही आयडिया आता ब्लॅक करणाऱ्यांना आली आहे. म्हणूनच समोरच्याचा पेहराव आणि गाडी लक्षात घेऊन तोंडाला येईल तो तिकीटदर ब्लॅक करणारे सांगतात. यांच्या तावडीतून सुटून बाहेर जाणाऱ्या प्रेक्षकाला आॅनलाइन दुकाने थाटलेल्यांचाही त्रास होत आहे. एका तिकिटामागे वीस रुपये बुकिंग चार्जेस घेऊन त्यांनीही दुसरा धंदाच थाटला आहे. याविषयी
‘ब्लॅक’साठी अशिक्षित महिला ‘आॅनलाइन’
By admin | Published: July 25, 2014 8:51 PM