मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद गेले एक वर्ष रिक्त आहे. या नगर परिषदेचा प्रभारी कार्यभार पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्याकडे देण्यात आला आहे.
त्यामुळे आठवड्यातील दोनच दिवस गुरुवार व शुक्रवार या दिवशी प्रभारी मुख्याधिकारी उपस्थित राहून कार्यभार पाहत आहेत.
सध्या कोरोनाचा संसर्गही वाढत आहे. मलकापूर शहरात अठरा रुग्ण कोरोना बाधित आहेत. कोरोनाला रोखण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांनाही गती मिळत नाही. त्याबरोबरच शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा निधी खर्च करण्यासाठी विलंब होत आहे. त्याबरोबरच नागरिकांना विविध अत्यावश्यक सेवा पुरवण्यामध्येही नियमितता येत नाही. त्यातच आता पावसाळा सुरू आहे. शहरातील ५० कुटुंबे पूरबाधित रेषेत आहेत. अशा ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांयाबाबत मुख्याधिकारी कायमस्वरूपी असणे गरजेचे आहे.
आंदोलनात नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, नगरसेवक दिलीप पाटील, अशोक देशमाने, मानसिंग कांबळे, भारत गांधी, नगरसेविका सोनिया शेंडे, मीनाक्षी गवळी, नम्रता कोठावळे, अश्विनी लोखंडे आदींनी पाठिंबा दिला आहे.
फोटो
मलकापूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा या मागणीसाठी टाळे ठोक आंदोलन करताना उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर ' सोनिया शेंडे , मानसिंग कांबळे आदी