काँग्रेस कमिटीमध्ये २३० जणांचे रक्तदान: रक्तदात्यांना प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 20:17 IST2021-04-05T20:16:34+5:302021-04-05T20:17:56+5:30
congress BloodBank Kolhapur- मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याला प्रतिसाद देत एकूण २३० जणांनी रक्तदान केले.

कोल्हापुरात सोमवारी काँग्रेस कमिटीमधील रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. यावेळी शेजारी संजय पवार, दुर्वास कदम, प्रल्हाद चव्हाण, निलोफर आजरेकर, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याला प्रतिसाद देत एकूण २३० जणांनी रक्तदान केले.
येथील काँग्रेस कमिटीमध्ये सकाळी नऊ वाजता पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते, तर आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले. उजळाईवाडी येथील राहुल आणि निशा मिनेकर यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याची नोंदणी करून त्याने रक्तदान केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, स्वाती नलवडे, उज्ज्वला चौगले, पद्मिनी माने, शिवांगी खोत, आदींसह एकूण २३० जणांनी रक्तदान केले. यावेळी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, विद्याधर गुरबे, तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, सचिन चव्हाण, संजय पवार-वाईकर, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, आदी उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सीपीआर, राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.