नेसरी : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत महारक्तदान शिबिर शनिवारी (दि. १०) सकाळी १० ते ३ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी तथा बाबूजी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त व येथील टी. के. कोलेकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गावातील विविध तरुण मंडळांच्या सहकार्याने हे शिबिर होत आहे, अशी माहिती प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी दिली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. एस. बी. चौगुले, डॉ. संजय कांबळे यांच्यासह बापूसो गव्हाळे, अमोल बागडी, गुलाबराव पाटील, सर्वेश गुंजाटी, आप्पासाहेब कुंभार, सौरभ हिडदुगी, शिवाजी पाटील, शाम नाईक, लक्ष्मीकांत नाईक, सतीश खराबे, पवन पाटील, आदी उपस्थित होते. अभिजित कुंभार यांनी आभार मानले. येथील श्री मसणाई मंदिर येथे होणाऱ्या या शिबिरासाठी गडहिंग्लज येथील डॉ. आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेचे सहकार्य मिळणार आहे.
चौकट
नेसरीतील ही मंडळे होणार सहभागी
जय शिवराय तरुण मंडळ, वीरशैव समाज गणेश मंडळ, जबरदस्त तरुण मंडळ, गजानन युवक मंडळ, शिवनेरी तरुण मंडळ, नवयुग तरुण मंडळ, राजे उमाजी नाईक मंडळ, शिवाजी तालीम व सामाजिक कार्य समिती, नेसरी याशिवाय गावातील महिलाही या रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहेत. शिबिरानंतर रक्तदात्यांची ब्लड ग्रुपसह नावेही प्रसिद्ध केली जाणार आहेत.