‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत आज राधानगरी येथील अंबाबाई मंदिरात रक्तदान शिबिर झाले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक उदय डुबल, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी यांच्या उपस्थित झाले. या वेळी ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक महेश पन्हाळकर, वसुली अधिकारी डी. पी. भोसले, पोलीस कृष्णात यादव, नेचर क्लब राधानगरीचे अध्यक्ष अनिल बडदारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश फणसे, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डी. जी. चौगुले, सचिव उमेश गायकवाड, मनसेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेश निल्ले, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक शिर्गावकर, ज्योतिर्लिंग फाउंडेशन आवळी बुद्रूकचे अध्यक्ष संदीप टिपूगडे, संजीवन ब्लड बँकेचे डॉ. प्रकाश दीक्षित, सचिन कवडे, आकाश बंडगर,
संयुजा घोळप, उमेश पाटील, नंदिनी गुरव आदी उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी संजय पारकर, वार्ताहर शिवाजी पाटील, रमेश साबळे यांनी संयोजन केले.
फोटो ओळ- राधानगरी येथील रक्तदान शिबिरातील दात्यांना प्रमाणपत्र प्रदान करताना तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक उदय डुबल, सरपंच कविता शेट्टी व अन्य मान्यवर.