कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे महारक्तदान शिबिर विविध ठिकाणी होत आहे. या उपक्रमात शिवाजी विद्यापीठ सहभागी झाले आहे. विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवारी (दि.१६) सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे.
या शिबिराचे संयोजन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने केले आहे. शिबिरात विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, रक्तदान हे जीवनदान आहे. म्हणूनच रक्तदान करून एखाद्या गरजू व्यक्तीला जीवन देणं, यासारखं दुसरं समाधान नाही. कोरोनाच्या काळात राज्याला, देशाला भासणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन ‘लोकमत’ समूहाने रक्तसंकलनाचा जो राज्यव्यापी उपक्रम हाती घेतला आहे, तो अत्यंत स्तुत्य स्वरूपाचा आहे. सकारात्मक हेतूने अगदी योग्य वेळी लोकाभिमुख पाऊल उचलल्याने जनतेचा या उपक्रमाला मोठा प्रतिसादही लाभतो आहे. निरोगी आणि पात्र नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि रक्तदान करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले आहे.
फोटो (१४०७२०२१-कोल-कुलगुरू फोटो) : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी रक्तदान शिबिर होणार आहे. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
140721\14kol_6_14072021_5.jpg
फोटो (१४०७२०२१-कोल-कुलगुरू फोटो) : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी रक्तदान शिबीर होणार आहे. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)