साळवण:--
‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत म.ह.शिंदे महाविद्यालय तिसंगी (ता.गगनबावडा) येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. पाऊस सुरू असताना देखील या शिबिरासाठी ३८ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला.
माजी सैनिक सदाशिव गुरव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्ञान साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक पी.जी. शिंदे, प्राचार्य एन. के.शिंदे, स्वप्निल शिंदे, विनायक सनगर, संदीप पाटील उपस्थित होते. विनायक सनगर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास बंकट थोडगे, प्रकाश मेगाणे, उत्तम पाटील, विवेक सणगर, सुप्रीम शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
अंगणवाडी सेविका गगनबावडा यांची ही उपस्थिती मोठ्या संख्येने होती. सागर पाटील (तिसंगी) सामाजिक कार्यकर्ते यांनीही आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान केले.
या शिबिरास वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले, आत्मा- कृषी विभाग गगनबावडा पराग परीट, तालुका प्रकल्प अधिकारी वनिता इस्टे, ग्रामसेवक अमित पाटील,होमगार्ड अक्षय पाटील,उत्तम पाटील, संतोष डाकवे, अमर कांबळे, सागर पाटील, दिलीप कांबळे, विनायक पाटील, चंद्रकांत पाटील, भाऊसोा शिंदे उपस्थित होते.
फोटो--
सागर पाटील 1
अंगणवाडी सेविका 2 रक्तदान करतेवेळी, 3----,संस्थापक अध्यक्ष पी.जी.शिंदे, प्राचार्य एन. के. शिंदे, माजी सैनिक सदाशिव गुरव, स्वप्नील शिंदे, विनायक सनगर, चंद्रकांत पाटील, भाऊसोा शिंदे.
दीप प्रजवलन4