शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

CoronaVirus : रक्तपेढ्यात रक्त झाले उदंड, रक्तदान शिबिरे केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 12:00 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे.

ठळक मुद्देरक्तपेढ्यात रक्त झाले उदंड, बारा रक्तपेढ्यात ३९२२ पिशव्या पडून रक्तदान शिबिरे केली बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे.दातृत्वाच्या बाबतीत कोल्हापूरकरांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यातही रक्तदान म्हटले तर येथे रक्तदानाची शंभरी पार करणारे अनेकजण भेटतात. प्रशासन अथवा रक्तपेढ्यांनी नुसते आवाहन केले की, हजारो पिशव्या रक्त संकलन होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात रक्ताची मागणी कमी राहिली.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठड्यात राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये काहीसी शिथिलता दिल्याने नागरिकांनी नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णालये गाठली. पंधरा दिवसांत सर्वच रुग्णालयांतून रक्ताची मागणी वाढली होती. त्यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईत रक्ताची टंचाई भासू लागली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेसह इतर सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरे घेतली. त्यात शिवराज्याभिषेक सोहळा शिवभक्तांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून साजरा केला. त्यामुळे गेले आठ-दहा दिवसांत सर्वच रक्तपेढ्यात रक्ताची आवक मोठ्या प्रमाणात झाली. रक्त आता ठेवायला जागा नसल्याने शिबिरे नाकारली जात आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजनाच्या सूचना वरिष्ठाकडून दिल्या असल्यातरी आता रक्तपेढ्याच रक्त घ्यायला तयार नाहीत.जुलैमध्ये रक्ताच्या मागणीत वाढ शक्यपावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार डोके वर काढतात. आताच जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. जुलैमध्ये त्याचा फैलाव झाला तर रक्त घटकांची गरज भासणार आहे. त्यावेळी रक्ताची मागणी आणि पुरवठा सुरळीत ठेवावा लागणार आहे.असा आहे रक्तपेढ्यातील साठा (पिशवी)रक्तपेढी                     साठा

  1. सीपीआर                    ५६
  2. महापालिका               ८३
  3. शाहू                           २२१
  4. जीवनधारा                ५४१
  5. तुळशी (उदगाव)       ३४०
  6. अर्पण                        ६४४
  7. वैभवलक्ष्मी               ४९३
  8. गडहिंग्लज                ३२६
  9. लाईन्स (इचलकरंजी) ९२
  10. डी. वाय. पाटील          ७४
  11. आधार                       ९१
  12. संजीवनी                  ४५१
  • एकूण                     ३९२२

 

विशिष्ट कालावधीपर्यंतच रक्ताचा साठा करता येतो. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे सध्या रक्तदान संकलन बंद केले आहे. आणखी पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासणार आहे, त्यासाठी रक्तदात्यांनी शासनाच्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.- दीपा शिपूरकर,रक्तसंकलन समन्वय अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरBlood Bankरक्तपेढी