शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

बोगस विद्यार्थी नोंद, शाळांची ३ कोटींची वसुली थकीत; राज्यातील २८२ शाळांवर कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:55 AM

राज्यात ३ ते ५ आक्टोबर २०११ मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबवण्यात आली होती.

समीर देशपांडे कोल्हापूर : राज्यामध्ये २०११ मध्ये घेण्यात आलेल्या विशेष पटपडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या खासगी, जि. प. प्राथमिक शाळांकडून चार कोटी १४ लाख रुपयांची वसुली लावण्यात आली होती. परंतु दहा वर्षे झाली तरी त्यातील केवळ १ कोटी १५ लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित सुमारे ३ कोटी रुपयांची वसुली लावण्यात आली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांतील २८२ शाळांवर याबाबत कारवाई करण्याचा इशारा एका परिपत्रकानुसार देण्यात आला आहे.राज्यात ३ ते ५ आक्टोबर २०११ मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये राज्यातील ४०० हून अधिक शाळांमध्ये प्रत्यक्षात पट कमी असून त्याठिकाणी जादा पट दाखवल्याचे निष्पन्न झाले होते. या बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षकांच्या पदांमध्ये वाढ करवून घेऊन तसेच शिष्यवृत्ती आणि ईबीसी सवलतीच्या माध्यमातून कोट्यवधीचा गैरकारभार केल्याचे आढळून आले होते.

अशा विद्यार्थी संख्या बोगस दाखवणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करावी, यासाठी ब्रिजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. यावेळी यातील दोषी शाळांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु ही वसुली न झाल्याने मिश्रा यांनी पुन्हा दोनवेळा न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली होती. त्यामुळे येत्या चार दिवसांत या शाळांकडून २ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये वसूल करावेत, असे परिपत्रक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी २२ जिल्ह्यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ९ फेब्रुवारी २२ रोजी काढले आहे.या शाळा जर ही रक्कम भरणार नसतील तर त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करून अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्हा            दोषी शाळा             वसूल रक्कम 

ठाणे                  ०७                       ९,११,२८९रायगड              १२                        १०,४९,२२५धुळे                   १२                        ९७,५०,९७३जळगाव            ११                         १,७२,८०५पुणे                   ०१                         ८,७७,३२२सोलापूर            ६९                        ७८,३४,६८५औरंगाबाद        ००                         ६५,५१६जालना              ०८                        ४०,१८४बीड                  १४                        १०,७८,१५०परभणी             ११                         ४,५०,७२८हिंगोली             ०२                         ८५,८०७लातूर               २३                          ७,०२,४१३नांदेड              २४                          ५,७९,०३३उस्मानाबाद     ०८                          ५,९२,२७६नागपूर            २५                          १,११,३८७वर्धा                ०१                           ७१,८८०भंडारा           ०६                           ३,१६,०३१गोंदिया          १३                            ३६,७६,०००अमरावती      ०६                          ७,८६,९४१अकोला         ०४                           २,२९,६२२वाशिम           ०७                          ३,७७,५००बुलडाणा        ०५                          १,१६,३१६एकूण            २८२                        २,९८,७६,०८३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी