डॉ. गवस म्हणाले, सरोजिनी बाबर यांनी समाजात प्रचलित असणारी अनेक गीते, त्यातील लोकज्ञान वेचण्यासाठी संकलित करण्यासाठी आयुष्यभर संशोधन कार्य केले. त्यापुढे जाऊन बुरसटलेल्या समाजाला जागृत करीत राहण्याचे काम केले. जीवनात अनेकविध जबाबदाऱ्या पेलत असताना सातत्याने त्या बहुजन समाजाच्या सांस्कृतिक प्रतिनिधी होत्या. या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने चर्चासत्रे आयोजित केली. हे पुस्तकही साकारले, ही समाधानाची बाब आहे. यापुढील काळातही अशाच दर्जेदार ग्रंथनिर्मितीसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गोरगरीब, शेतकऱ्यांविषयी प्रचंड कळकळ व आस्था बाळगून त्यांच्यासाठी, त्यांच्यामधीलच लोकसाहित्याचे कण वेचून सरोजिनी बाबर यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या योगदानाची अतिशय उत्तम दखल या पुस्तकात घेण्यात आली आहे.
प्र-कुलगुरू डाॅ. पी. एस. पाटील , कुलसचिव डाॅ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर मृणालिनी जगताप यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नितीन माळी, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे , किरण गुरव, आदी उपस्थित होते.
फोटो : ०७०१२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ
ओळी : शिवाजी विद्यापीठात सरोजिनी बाबर : कार्य, संशोधन आणि लेखन या पुस्तकाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डाॅ. पी. एस. पाटील, डाॅ. राजन गवस, कुलसचिव डाॅ. विलास नांदवडेकर, संतोष सुतार, डाॅ. प्रकाश पवार, डाॅ. वैशाली भोसले, डाॅ. रणधीर शिंदे, डाॅ. नंदकुमार मोरे, आदी उपस्थित होते.