: शिये (ता. करवीर) येथील श्री रामकृष्ण विवेकानंद वाचनालयाच्या वतीने शिये कोविड केअर सेंटरमधील कोविड रुग्णांसाठी पुस्तक पेढी उपक्रम सुरू करण्यात आला. रुग्णांचा ताणतणाव कमी व्हावा, त्यांचे मन प्रसन्न रहावे, ज्ञान शक्ती व मन शक्ती वाढावी या हेतूने वाचनालयाच्या वतीने पुस्तक पेढी उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये कर्तुत्ववान व्यक्तींची आत्मचरित्रे, सकारात्मक दृष्टिकोन तयार करणारी पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत. यावेळी डॉ. विलास सातपुते, कोविड केअर सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशिद, जयसिंग पाटील, नीलेश कांबळे, मच्छिंद्र मगदूम, नीलेश कदम, वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण कदम, डॉ. चंद्रकांत मगदूम, ग्रंथपाल मनोज ठोंबरे उपस्थित होते.
फोटो : २८ शिये कोविड सेंटर
शिये येथील कोविड सेंटरवर श्री रामकृष्ण विवेकानंद वाचनालयाच्या वतीने कोविड रुग्णांसाठी पुस्तक पेढी उपक्रमाअंतर्गत पुस्तके देण्यात आली.