शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

समीरच्या विरोधात दोघांचे जबाब

By admin | Published: July 28, 2016 12:32 AM

पानसरे हत्या प्रकरण : दोषारोपपत्रावरील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी होणार

कोल्हापुर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात संजय अरुण साडविलकर व शैलेंद्र दिगंबर मोरे या दोघा साक्षीदारांचे जबाब प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर घेण्यात आले होते. सरकारी पक्षाच्या मागणीनुसार सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी बुधवारी या जबाबांची नोंद दाखल झालेल्या दोषारोपपत्रामध्ये घेतली. तसेच गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने दि. ११ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे बुधवारी होणारी सुनावणी दि. १२ आॅगस्ट रोजी ठेवली. पानसरे हत्येतील संशयित मारेकरी समीर गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी सुनावणी बुधवारी होती. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी आरोप निश्चित करण्यासंबंधी उच्च न्यायालयाची स्थगिती आहे; त्यामुळे सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे केली. आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी दि. १२ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवावी, अशी विनंती केली. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार संजय साडविलकर यांच्यासह पानसरे हत्येतील प्रत्यक्ष साक्षीदार शैलेंद्र मोरे या दोघांचे इनकॅमेरा जबाब प्रथम वर्ग न्यायाधीश पाटील यांच्यासमोर झाले. मोरे यांचा दि. १४ व साडविलकर यांचा १७ जुलै रोजी जबाब नोंदविले आहेत. हे जबाब दाखल दोषारोपपत्रामध्ये की पुरवणी तपासामध्ये नोंदवायचे, असा प्रश्न न्यायाधीश बिले यांनी सरकारी वकिलांना केला. त्यावर अ‍ॅड. बुधले यांनी दोषारोपपत्रामध्येच नोंद करून घ्यावे, असे सांगितले. फिरण्यास बंदी घातल्याची तक्रारसमीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडासेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला सत्र न्यायालयाने दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडासेलच्या बाहेर फिरण्यास मुभा दिली होती; परंतु कारागृह प्रशासनाने त्याला बाहेर सोडण्यास बंदी घातली आहे. त्याला पहिल्यासारखी मोकळीक द्यावी, अशी विनंती समीरचे वकील पटवर्धन यांनी केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी तसा अर्ज द्यावा. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाला यासंबंधी नोटीस पाठविली जाईल, असे सांगितले.