शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दोन्ही काँग्रेस - शिवसेनेमध्ये अंतर्गत समझोता

By admin | Published: February 04, 2017 12:57 AM

जिल्हा परिषदेचे रणांगण : भुदरगड, पन्हाळा, करवीर, दक्षिणमध्ये घडामोडींना वेग

कोल्हापूर : स्वबळाची भाषा सर्वच राजकीय पक्षांनी केली असली तरी अनेक मतदारसंघात स्वत:च्या ‘बळा’वर उमेदवार विजयी करणे त्यांना मुश्कील आहे. त्यामुळेच नेत्यांनी अंतर्गत तडजोडीस सुरुवात केली असून भुदरगड, पन्हाळा, करवीर, दक्षिण मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समझोता झाल्याचे स्पष्ट होते. भाजपने सत्तेच्या बळावर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून अनेक मतदारसंघांत तसे आव्हान तयार केले आहे. पक्षाचा झेंडा वेगळा असला तरी एकमेकांना राजकारणात सहकार्य करणाऱ्या नेत्यांनी अंतर्गत समझोता केला आहे. भुदगडमध्ये आमदार प्रकाश आबीटकर हे जरी शिवसेनेचे असले तरी ते आमदार सतेज पाटील यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे आमदार पाटील, आबीटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव या तिघांची येथे आघाडी पूर्ण झाली आहे. चार जिल्हा परिषदांपैकी गारगोटी व पिंपळगाव या दोन जागा आमदार आबीटकर गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. पिंपळगावमधून आमदार आबीटकर यांच्या भावजय व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबीटकर यांच्या पत्नी रिंगणात उतरणार आहेत. करवीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व शिवसेना यांची छुपी युती आहे. विधानसभेसह ‘भोगावती’च्या निवडणुकीत तिघे एकमेकांना मदत करतात. आता ‘परिते’ राष्ट्रवादीला, सडोली खालसा ‘शेकाप’ तर सांगरूळ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. पन्हाळ्यात तर शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेस यांनी उघड युती केली आहे. कळे, कोतोली शिवसेनेला, पोर्ले तर्फ ठाणे राष्ट्रवादीला, सातवे काँग्रेसला (अमर पाटील) तर कोडोली अमर पाटील व भारत पाटील यांना सोडण्यात आला आहे. ‘दक्षिण’मध्ये दोन्ही कॉँग्रेसमध्ये काही ठिकाणी ‘नुरा कुस्ती’ होण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रवादी म्हणजे महाडिक गट असेच समीकरण आहे. उर्वरित राष्ट्रवादीची ताकद फारच कमी आहे. त्यामुळे येथे आमदार सतेज पाटील यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंचायत समितीच्या दोन-तीन जागांवर येथे तडजोड होऊ शकते. भुदरगडमध्ये ‘के. पी.- बजरंगअण्णा’ एकत्र?भुदरगडमध्ये दिनकरराव जाधव व प्रकाश आबीटकर हे एकत्र आहेत, त्यांना सतेज पाटील यांचे पाठबळ आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांनी के. पी. पाटील यांच्याशी समझोता करण्यास सुरुवात केली आहे; पण चर्चेचे घोडे ‘आकुर्डे’ मतदारसंघावर आडून बसले आहे. पाटील यांनी येथून जीवन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर देसाई यांना येथून प्रदीप पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे. हा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही माजी आमदारांचा कस लागला आहे.