शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’चे दोघे पसार

By admin | Published: April 18, 2016 12:56 AM

तृप्ती देसाई मारहाण प्रकरण : पोलिसांकडून घरांची झडती; संशयितांनी ठेवले मोबाईल बंद

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच श्रीपूजकांसह राष्ट्रवादीचे दोघे कार्यकर्ते पसार झाले. पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांच्या घरांची झडती घेतली. त्यांनी मोबाईलही बंद ठेवले आहेत, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. तृप्ती देसाई काही महिलांसह बुधवारी (दि. १३) अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आल्या असताना त्यांना गाभाऱ्यातून बाहेर ओढत श्रीपूजकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मारहाण केली. त्याप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता संशयित आरोपी अ‍ॅड. केदार वसंत मुनीश्वर, श्रीश रामभाऊ मुनीश्वर, चैतन्य शेखर अष्टेकर, मयूर मुकुंद मुनीश्वर, निखिल शानभाग (सर्व, रा. वांगी बोळ, महाद्वार रोड), राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन मुरलीधर कल्याणकर, जयकुमार रंगराव शिंदे (दोघे रा. मंगळवार पेठ) आदीजण देसाई यांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. या चौकशीचा अहवाल त्यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना सादर केला. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांची सरकारी फिर्याद घेऊन श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’च्या दोघा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गंभीर कलमे लावल्याने कारवाईच्या भीतीने श्रीपूजक व ‘राष्ट्रवादी’चे दोघे कार्यकर्ते शनिवारी रात्रीपासून पसार झाले. त्यांनी मोबाईलही बंद ठेवले आहेत. पोलिसांनी रविवारी पहाटे ‘अंबाबाई’ मंदिरात संशयित श्रीपूजकांवर पाळत ठेवली होती; परंतु ते फिरकलेच नाहीत. त्यानंतर सातही आरोपींच्या घरी झडती घेतली असता ते मिळून आले नाहीत. श्रीपूजकांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे नातेवाईकही बिथरले आहेत. ते कोठेही लपून राहिले तरी त्यांना अटक करणार असल्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. काही महिलांची नावे निष्पन्नउच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही तृप्ती देसाई यांना गाभाऱ्यात जाताना हातवारे करून रोखणाऱ्या काही महिलांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यामध्ये काही श्रीपूजकांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. देसाई यांना शिवीगाळ करून अंगावर हळद-कुंकू फेकणाऱ्या महिलांचे चित्रीकरण स्पष्ट दिसत आहे. लवकरच कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून त्यांची नावे पोलिस रेकॉर्डवर आणली जातील, असे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नसंशयित आरोपींमध्ये केदार मुनिश्वर हे स्वत: वकील आहेत. त्यामुळे पोलिसांनी अभ्यासपूर्ण कलमे आरोपींच्या विरोधात लावली आहेत. सर्वच आरोपींनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यासाठी वकिलातर्फे फिल्डिंग लावली आहे. अशी होणार कारवाई श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’च्या दोघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी होईल. त्यानंतर १४१ कलमानुसार नोटीस बजावली जाईल. त्यानंतर तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल. दरम्यान, या सर्वांनी जामीन घेतल्यास सीआरपीसी कलम ४१ नुसार पोलिस त्यांना चौकशीसाठी बोलावू शकतात.