विश्वास पाटील- कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक ज्या जागेवर होणार आहे ती जमीन इनामी असल्याने तिला मोबदला देता येत नाही. हीच या स्मारकातील मोठी अडचण होऊन बसली आहे. हे स्मारक होण्यासाठी दलित संघटनांनी एकीची वज्रमूठ आवळण्याची गरज आहे. माणगावला शुक्रवारी बौद्ध व आंबेडकरी बांधवांतर्फे सहाव्या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात येत आहे. जिथे आंबेडकर यांचे पाऊल लागले, अशी ही पवित्र जागा आहे. त्यामुळे या स्मारकाला वेगळेच महत्त्व आहे. हे स्मारक रखडण्याचे सगळ््यात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यासाठी लागणारी जागा. ग्रामस्थ जागा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्या देत असलेल्या जमिनी या इनामी आहेत. कायद्याने ‘इनामी जमिनी’ला सरकार मोबदला देत नाही. कारण या जमिनीवर सरकारची मालकी असते. स्मारकासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार असेल तर त्यांना काही ना काही मोबदला देण्याची गरज आहे; परंतु तो द्यायचा झाल्यास कायद्यात बदल करावा लागतो. शासन त्या पातळीवर फारसा ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. त्यामुळे भूसंपादनाचे व पर्यायाने स्मारकाचे काम रखडले आहे.दलित चळवळीतील विविध गटांच्या राहुट्या वेगळ््या असल्या तरी किमान काही प्रश्नांवर तरी या समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सगळे गट एकत्र येऊन साजरी करतात, तशीच सर्व गटांना प्रतिनिधित्व देऊन या स्मारकाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन होण्याची गरज आहे. (समाप्त)मंजूर दहा कोटी रुपये निधी मिळविण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहे. आता सरकार आमचे आले असल्याने त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझीच आहे.- डॉ. सुजित मिणचेकर, आमदार राज्यात सत्तेत आलेल्या सरकारची मानसिकता आंबेडकरी विचार व चळवळ मोडून काढणारी आहे. त्यामुळे सर्वांनी स्मारकासाठी नव्याने संघर्षाची गरज आहे. - दगडू भास्करजिल्हाध्यक्ष, जोगेंद्र कवाडे गटस्मारक लवकर व्हावे यासाठी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समाजकल्याण मंत्री रामनाथ बडोले यांना भेटणार आहे. या शासनानेही हलगर्जीपणा केल्यास आंदोलन करू.- प्रा. शहाजी कांबळेपश्चिम महाराष्ट्र संघटक,आठवले गट‘के.पी.’ यांच्यावर टीकास्मारकासाठी दहा कोटी रुपये मंजूर आणले म्हणून सगळीकडे डिजिटल लावून सत्कार करून घेणाऱ्या तत्कालीन आमदार के. पी. पाटील यांना माणगाव कुठे आहे हे तरी माहीत आहे का, अशी विचारणा आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली आहे. के. पी. यांनी श्रेयवाद घेतलेला निधी कुठे आहे हे सांगावे व आंबेडकरी जनतेची फसवणूक करू नये, अशी टीका प्रा. शहाजी कांबळे यांनी केली.
इनामी जमीन हीच मार्गातील अडसर
By admin | Published: March 25, 2015 10:57 PM