कोल्हापूर : चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंड्रस्ट्रीजसह सर्व व्यावसायिकांच्या संघटनांनी मंगळवारी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला.
नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांच्या भारतीय सामान हमारा अभिमान व चिनी वस्तूंवर बहिष्कार या देशव्यापी अभियानाची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव, कॅटचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील व संघटन सचिव ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी चौक येथून अभियान सुरू झाले. चीनच्या वस्तू खरेदी अथवा विक्री न करण्याचा निर्धार यावेळी केला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबविण्यात आली.चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव वैभव सावर्डेकर, राजू पाटील, संचालक राहुल नष्टे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश केसरकर, धनाजी पाटील, महेश धर्माधिकारी, उदयसिंह निंबाळकर, विनोद डुणुंग, शिवानंद पिसे, आदी उपस्थित होते.कोल्हापुरातून चायनीज वस्तू हद्दपारदि कंझ्युमर्स प्रॉडक्टस् डिस्ट्रिब्युटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी ह्यकोणत्याही किराणा दुकानात येथून पुढे चायनीज माल दिसणार नाही, असे स्पष्ट केले. स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय दुग्गे, आय. टी. असोसिएशन ऑफचे अध्यक्ष शांताराम सुर्वे, इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, टॉयज बॅग्ज व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई गोयानी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार अथणे, प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष, संजय पाटील यांनीही चीनच्या वस्तूंवर बहिष्कार असल्याचे सांगितले.कोल्हापुरी चपलांना प्राधान्यकोल्हापुरी चप्पलला जास्तीत जास्त मागणी कशी राहील यासाठी प्रयत्न करणार व चप्पल विक्रेत्यांकडून चायनीज चप्पल विकले जाणार नाही.असे जिल्हा फूटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी स्पष्ट केले.शहरात फलक उभारणारचिनी मालाची पाच लाख कोटी होणारी वार्षिक आयात ३१ डिसेंबरपर्यंत एक लाख कोटींनी कमी करणे हे उद्दिष्ट आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने यासाठी ग्राहकवर्गात फलक लावून प्रबोधन करणार असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले.मेनूकार्डवरून चायनीज गायबचेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी हॉटेलमधील मेनूकार्डामध्ये चायनी पदार्थाचे नाव असणार नाही. तसेच चायनीज पदार्थ तयार केले अथवा विकले जाणार नाहीत, असा निर्धार केला. यावेळी हॉटेलमधील चिनी पदार्थांच्या मेनूकार्डची होळी करण्यात आली.