शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘पशुसंवर्धन’च्या आढाव्यावर सदस्यांचा बहिष्कार-

By admin | Published: November 02, 2014 9:56 PM

-गडहिंग्लज पंचायत समिती सभा

गडहिंग्लज : वेळोवेळी मागणीचा ठराव करूनदेखील तालुक्यातील जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टरांच्या रिक्त जागा न भरल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या सदस्यांनी मासिक सभेत पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यावर बहिष्कार टाकला. सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेत शिक्षण, आरोग्य व बांधकाम खात्याच्या कामकाजावर जोरदार चर्चा झाली. प्र. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. ‘नरेगा’ योजनेतून वर्षभरात ठोस काही मिळाले नाही. म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप बाळेश नाईकांनी केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. पल्लवी मिरजकर या आपल्या विभागाचा आढावा देत असताना ‘नरेगा’चा मुद्दा उपस्थित झाला. याबाबत अभ्यास करून चार दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन उपसभापती तानाजी कांबळे यांनी दिले.वस्तीशाळा शिक्षकांच्या थकित वेतनाच्या मुद्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा पातळीवरून अनुदान कमी आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांनी सांगितले. सकारात्मक आश्वासनाअंती या विषयावरील प्रदीर्घ चर्चा थांबली.हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या रिक्त पदाचा मुद्दा नाईकांनी उपस्थित केला. आपण स्वत: त्या केंद्रात आठवड्यातून ३ दिवस सेवा देत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी यांनी सांगितले. रूग्णांच्या सोईसाठी तसा फलक का लावला जात नाही, असा सवालदेखील नाईकांनी विचारला. मीना पाटील यांनी रस्त्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.पंचायत समिती सदस्य इकबाल काझी, सरिता पाटील व रजनी नाईक, प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभिनंदन अन् निषेधहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नूतन मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव नाईकांनी मांडला. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर व जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव स्नेहल गलगले यांनी मांडला. ‘बेळगाव’चे नाव ‘बेळगावी’ केल्याबद्दल कर्नाटक शासनाच्या निषेधाचा ठरावही नाईकांनी मांडला.अभिनंदन अन् दुर्दैवहीप्रत्येक सभेत अभिनंदन व श्रद्धांजलीचे ठराव होतात. परंतु, संबंधितांना त्याबाबत एकही पत्र जात नाही. यासारखी दुर्दैवी बाब नाही, अशी खंत नाईकांनी व्यक्त केली. याबाबत सूचना संबंधितांना देण्याचे आश्वासन उपसभापती कांबळे यांनी दिले.