शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

बारावीसह सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार, राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 2:58 PM

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग इतर अनेक प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित

कोल्हापूर : राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग इतर अनेक प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने उद्या, गुरुवारपासून बारावीसह सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार असे आंदोलन सुरू करण्यात येईल. यामध्ये शिवाजी विद्यापीठ सेवक संघ सहभागी होईल, अशी माहिती संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद भोसले, आनंदराव खामकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, सुधारित आश्वासित प्रगती योजना, रिक्त पदांची भरती अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चार वर्षांपासून शासनाकडे संयुक्त कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, केवळ आश्वासनाशिवाय समितीच्या पदरात काहीही पडलेले नाही. त्यामुळे समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून गुरुवारपासून राज्यातील विविध विद्यापीठ, महाविद्यालयांतील सुमारे ४० हजार कर्मचारी बारावीसह सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.दरम्यान, आंदोलनाची माहिती देण्यासाठी दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सेवक संघाची द्वारसभा झाली. सभेस संजय पवार, राम तुपे, विनया कुंभार, वंदना गुरव, माधुरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकexamपरीक्षा