शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जागृती मेळाव्यावर महिला व बालविकास समितीचाच बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 1:12 PM

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्यावर ज्या विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले त्याच खुद्द महिला व बालकल्याण विकास समितीनेच बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देजागृती मेळाव्यावर महिला व बालविकास समितीचाच बहिष्कारजिल्हा परिषदेतील राजकारण : शौमिका महाडिक यांची मंडलिक यांच्यावर सडकून टीका

कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्यावर ज्या विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले त्याच खुद्द महिला व बालकल्याण विकास समितीनेच बहिष्कार टाकला.खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. त्यांनी गेल्या पाच वर्षांत खूप चांगली कामगिरी केली असल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मदत करूया, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

ज्यांना जिल्हा परिषद नीट सांभाळता आली नाही, त्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला अध्यक्षा महाडिक यांनी संजय मंडलिक यांचे नांव न घेता लगावला.जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्डमधील रामकृष्ण हॉलमध्ये महिला कायदेविषयक जाणीव जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून आक्काताई ढेरे यांचा आणि राष्ट्रीय पोषण आहार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजश्री साळसकर यांचा सत्कार केला. मेळाव्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतुक खासदार महाडिक यांनी केले, तर भारताची भावी पिढी सुदृढ बनविण्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे, यापूर्वीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आणि महिलांचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडविले आहेत. त्यांच्या वयोमर्यादेत वाढ, पेन्शन आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षा महाडिक यांनी खासदार महाडिक हे कु टुंबातील सदस्य आहेत, त्यांनी खूप चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी आवाहन केल्यानुसार त्यांना निवडणुकीत मदत करण्याची ग्वाही दिली.

शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी समाज घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद असल्याचे सांगितले.पक्षप्रतोद विजय भोेजे यांनी महिलांनी महिलांचे शत्रू बनू नये, स्त्री भ्रूणहत्येला विरोध करावा, मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे आवाहन केले.

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या खासदार महाडिक यांना चौथ्यांदा संसदरत्न मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पल्लवी थोरात यांनी ‘महिलांच्या हितासाठी असलेले कायदे आणि महिलांची कर्तव्ये’याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व   बालविकास)सोमनाथ रसाळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

सभापती वंदना मगदूम अनुपस्थितइचलकरंजीतील कार्यक्रमातील लोकप्रतिनिधींच्या नावावरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभेत दिलगिरीची वेळ आलेल्या महिला व बालविकास सभापती वंदना मगदूम यांनी या जागृती मेळाव्यास समिती सदस्यांसह दांडी मारली. हा कार्यक्रम शुक्रवारी जागतिक महिला दिनी घेण्याऐवजी सर्वांना विश्वासात न घेता गुरुवारीच घेतल्याने सभापती मगदूम यांनी नाराजी व्यक्त केली. 

 

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर