रुकडी गावातील महादेव मंदिराशेजारी राहत असलेले एकनाथ कुलकर्णी पत्नीसह घरगुती कार्यकमासाठी बाहेरगावी गेले होते. यांचा अंदाज घेऊन आज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री काम फत्ते केले. ही चोरी शेजाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना यांची माहिती दिली. एकनाथ कुलकर्णी निवृत्त बँक कर्मचारी व पत्नी निवृत्त पोष्ट कर्मचारी आहेत. घटनास्थळ हे भरवस्तीत असून चोरट्यांनी धाडशी चोरी केल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भरवस्तीतील चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी कोल्हापूर येथून श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वान घटनास्थळापासून घुटमळून शेजारच्या शेतवडीपर्यंतचा मार्ग काढला तर ठसेतज्ज्ञांनी चोरीच्या ठिकाणचे पुरुषाचे ठसे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
रुकडी येथे धाडसी चोरी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:25 AM