कोल्हापूर : कोरोनाच्या या काळात अन्नपाण्याविना आबाळ होऊ नये, म्हणून शिवसमर्थ संस्था व भारतीय युवा मंचने गरजूंचा शोध घेऊन मायेचा घास भरवण्यास सुरुवात केली आहे. अध्यक्ष जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते रोज १०० जणांना अन्नाची पाकिटे जागेवर पोहच करत आहेत. यात संतोष पवार, रणविरसिंह निंबाळकर, संजय जांभळे, संतोष साेनवणे, विष्णू माने, हर्षद गुरव हे आघाडीवर काम करत आहेत.
फोटो: ०९०६२०२१-कोल-शिवसमर्थ
फोटो ओळ: शिवसमर्थ व भारतीय युवा मंचतर्फे गरजूंना मोफत अन्नदान केले जात आहे.
हिंदू एकतातर्फे शिवराज्याभिषेक साजरा
कोल्हापूर : हिंदू एकता आंदोलनतर्फे कार्यालयातील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सुरेश चौगुले, संजय साडविलकर, गजानन तोडकर, बापू वडगावकर, आण्णा पोतदार, नंदू आहेर, हिंदूराव शेळके, रणजित डाकवे, नवनाथ जाधव, सुरेश लाड उपस्थित होते.
मिलिंद शिक्षण संस्थेत कार्यक्रम
कोल्हापूर : मिलिंद शिक्षण संस्था संचालित पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खु., ता. कागल येथे शिवराज्याभिषेक दिन मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाने साजरा झाला. संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आर्सेनिक अल्बम औैषधांचे वाटप
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शाहूपुरीतील सामाजिक कार्यकर्ते सुमित साटम यांनी परिसरातील दोन हजार कुटुंबांना आर्सेनिक अल्बम या कोरोनावरील प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधांचे वाटप केले. यावेळी डॉ. शिवराज जितकर, लक्ष्मी घाटगे, मनोरमा पाटील, नानीबाई चाैगुले, प्रतीक शिर्के, धनंजय नाटेकर, सौरभ संकपाळ, तेजस शिंदे, अक्षय घाटगे, ऋषिकेश घाटगे उपस्थित होते.
जीवनावश्यक साहित्य वाटप
कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अल्पसंख्याक युवक कॉंग्रेसचे दस्तगीर शेख, सर्जेराव साळाेखे यांनी स्वातंत्र्यसैनिक वसाहत, भारतनगर येथील ५०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटण्यात आले. शेख यांनी स्वत:च्या वाढदिवसादिवशी देखील शेंडा पार्क, आयसोलेशन, रेल्वेस्टेशन, एस.टी. स्टॅन्ड येथील ४०० गरजूंना अन्नदान करण्यात केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील बॉक्साइटचे अवैध उत्खनन व वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन परिवर्तन पार्टीप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती आज गुरुवारी दुपारी १२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक व महिला अध्यक्ष मनीषा नाईक यांनी पत्रकाद्वारे दिली.