शिरोळ : तालुक्यात सोमवारी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त झाला होता. शेतामध्ये सध्या खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे, तर काही ठिकाणी भाजीपाला पिकांचेही उत्पादन घेण्यात आले आहे. दोन दिवस पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे.
--------------------
घोसरवाड-हेरवाड रस्त्यावर पाणी
दत्तवाड : घोसरवाड-हेरवाड या मार्गावर गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पाणी येऊ नये म्हणून बांध घालून चरी बुजविल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे मुरूम टाकून बुजविण्यात आलेल्या चरी मोकळ्या कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
--------------------
दत्तवाड ग्रा.पं.ने औषध फवारणी करावी
दत्तवाड : सध्या जिल्ह्यात डेंग्युसदृश तापाची साथ आली आहे. त्याबरोबरच जागोजागी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दत्तवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीने औषध फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.