इचलकरंजी : राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आणि महोत्सव २०२१ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लघुपट पाठविण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२१ आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही देशातील कलाकारांना आपल्या भाषेतील लघुपट पाठविता येईल. स्पर्धकांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मनोरंजन मंडळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग लसीकरण मोहिमेस प्रारंभ
इचलकरंजी : समाज कल्याण विभाग जि. प. कोल्हापूर व ग्रामीण रुग्णालय हातकणंगलेच्यावतीने विशेष दिव्यांग लसीकरण मोहिमेस मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला. परिसरातील दिव्यांग महिला-पुरुष मोठ्या प्रमाणात हजर राहून लसीकरण करून घेतले. यावेळी डॉ. पद्माराणी पाटील, अरुण इंगवले, गोविंद दरक आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन समाजाचे निवेदन
इचलकरंजी : कोरोना काळात नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यात भर म्हणून केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या आहेत. याचा वंचित बहुजन समाजाने निषेध करत येथील प्रांत कार्यालयात निवेदन दिले. शिष्टमंडळात रावसाहेब निर्मळे, नानासाहेब पारडे, शीतल माने, सचिन कांबळे आदींचा समावेश होता.