दत्तवाड : येथील सुरेश नरसगोंडा पाटील यांची पंचमसाली लिंगायत समाजाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. समाजाची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यानुसार राज्य अध्यक्षपदी हेमंत पाटील, तर शिरोळ तालुकाध्यक्षपदी बी.एस. पाटील व जिल्हा उपाध्यक्षपदी विद्याधर पाटील यांची निवड करण्यात आली. सुरेश पाटील हे सध्या आत्मनिर्भर भारत जिल्हा सहसंयोजक, तसेच प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
फोटो - २७०६२०२१-जेएवाय-०२-सुरेश पाटील
--------------------------------
संजय गुरव यांची निवड
शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) येथील संजय भीमराव गुरव यांची शिरोळ तालुका काँग्रेस (आय) ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे व ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अशोक कोळेकर यांच्या हस्ते गुरव यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी अर्चना चौगुले, मिनाज जमादार, नितीन बागे, तातोबा पाटील, योगेश पुजारी, सदाशिव पोपळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------------------
नांदणीच्या श्रावणी मगदूमचे यश
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविले. या परीक्षेत श्रावणी मगदूम हिची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे, तर समीक्षा बुबणे, साक्षी माने या उत्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी विद्यार्थिनींना मुकुंद जोशी, माणकापुरे, एस.ए. मुळे, एस.एल. चिपरीकर, पी.एस. पाटील, एस.एम. गरड, प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एन. तलवार यांच्यासह पालकांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - २७०६२०२१-जेएवाय-०३-श्रावणी मगदूम
-------------------------------------
शिरोळ रोटरी क्लबकडून डॉक्टरांचा सन्मान
शिरोळ : जागतिक डॉक्टर्स डेच्या निमित्ताने १ जुलै रोजी शिरोळ रोटरी क्लब व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. नगरपालिका सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष दीपक ढवळे, सचिव सचिन देशमुख यांनी दिली. कोविड साथीच्या कालावधीमध्ये देवदूत ठरलेले वेगवेगळ्या विभागांतील डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते, तर मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर रोटे रुस्तुम मुजावर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, रोटरी क्लबचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.