जयसिंगपूर : साखर कारखान्यांनी एफआरपीवरील व्याज द्यावे, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’ या संघटनेने केली आहे. नुकतेच याप्रश्नी आंदोलनदेखील करण्यात आले होते. पंधरा टक्के व्याजप्रश्नी आज मंगळवारी मुंबई येथे सहकार मंत्र्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. याबाबत शासनाचे अव्वर सचिव यांनी आदेश दिले आहेत.
-------------------------
विकासकामांची चौकशी करा
जयसिंगपूर : शहरातील विकासकामांची चौकशी करावी, अशी मागणी दलित महासंघाच्यावतीने मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रभाग सातमधील विकासकामांकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप महासंघाने केला आहे.
------------------------
कर्मचाऱ्यांची दररोज हजेरी
शिरोळ : येथील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील कर्मचारी गैरहजर राहत असल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात काम करणारे कर्मचारी दैनंदिन उपस्थित राहत आहेत.