कबनूर : येथील नाभिक समाजाच्यावतीने नरवीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कबनूर नाभिक समाजाचे अध्यक्ष मल्लाप्पा माने यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी दादा पाटील, श्रीकांत व्हन्ने, संजय चव्हाण, शरद चव्हाण, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.
मुरूमामुळे अडचण
कबनूर : येथील साखरे गल्लीमध्ये रस्ता करण्यासाठी मुरूम टाकण्यात आला आहे. परंतु मुरूम तेथेच असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचण येत आहेत. तरी हा रस्ता लवकर पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
कबनूर : रत्नाप्पाण्णा कुंभार चौकातून कोल्हापूरला जाणारा रस्ता काही दिवसांपूर्वीच केला होता. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्यातून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.