अर्जुनवाड : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत शिरटी (ता. शिरोळ) येथील सीमा महावीर निडोणे यांना तलाठी कार्यालयात २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. या वेळी सरपंच अनिता चौगुले, तलाठी उमेश माळी यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य राहुल सूर्यवंशी, सुनील कांबळे, मच्छिंद्र कोळी उपस्थित होते.
हेरवाडमध्ये दंडात्मक कारवाई
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच दुपारी चारनंतर आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवरही कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांची धांदल
शिरोळ : तालुक्यातील कृष्णेसह, वारणा, दूधगंगा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर नदीकाठी असणाऱ्या गवती कुरणातील वैरण कापणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. तर कही ठिकाणी कुरण पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. एकंदरीत पाण्याची पातळी वाढत असून नदीकाठी असणाऱ्या मोटारी काढण्यासाठी शेतकरी व्यस्त आहेत.