कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ज्ञानेश्वर रामचंद्र कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाकडून मराठी विषयातील पीएच.डी. पदवी मिळाली आहे. त्यांनी विद्यापीठास वैद्यकीय क्षेत्रातील मराठी आत्मचरित्रांचा अभ्यास हा शोधनिबंध सादर केला होता. या शोधनिबंधासाठी त्यांना प्रा. डॉ. गोपाळ गावडे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. डॉ. राजन गवस व आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - १६०८२०२१-जेएवाय-०६-ज्ञानेश्वर कांबळे
-------------------------
उद्धव मगदूम यांची सामाजिक बांधीलकी
अर्जुनवाड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय जल आयोगाचे कार्य सहाय्यक उद्धव मगदूम यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमास एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. मदतीचा धनादेश बाबासाहेब पुजारी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संजय कोकणे, भूपाल मुंगळे, संजय फडतारे, विष्णू भंडारे उपस्थित होते.
-----------------------------
व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सुदर्शन एडवान
जयसिंगपूर : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सुदर्शन एडवान, उपाध्यक्षपदी दिपक मगदूम, सचिव पदी प्रवीण राजोपाध्ये, तर खजिनदारपदी निर्मल पोरवाल यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी व सल्लागार समिती सदस्यांमध्ये युवराज शहा, भगवंत जांभळे, विनय कदम, महेश पोरे, अनिल खाडे यांचा समावेश आहे.
फोटो - १६०८२०२१-जेएवाय-०७-सुदर्शन एडवान, दीपक मगदूम
----------------------
टायगर ग्रुपकडून जीवनावश्यक वस्तू
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील विकलांग वसतिगृहास टायगर ग्रुप ऑल इंडिया संस्थापक जालिंदर जाधव, संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी राकेश कोरवी, अमोल बुबणे, वंश कांबळे, वास्तव मरडे, दर्शन शंभुशेटे, अमन सनदी, योगेश माळी, अनिल कोरवी, नितीन कोरवी, संकेत खराडे, सतीश जांगडे उपस्थित होते.