(फोटो-१८०८२०२१-कोल-सी. के. नलावडे) लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकार खाते सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सी. के. नलावडे व सदस्यपदी बी. टी. व्हनाळे यांची निवड झाली.
डाव्यांच्या वतीने आज बिंदू चौकात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘चूल बंद, कचेरी बंद’ आंदोलनाच्या स्मृती दिनानिमित्त गुरुवारी सकाळी अकरा वाजता बिंदू चौकात डाव्या पक्षांच्या वतीने केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने १९ ऑगस्ट १९६५ रोजी त्यावेळच्या वाढत्या महागाईविरोधी ‘चूल बंद, कचेरी बंद’ आंदोलन केले होते. या आंदोलनात सहा हुतात्मे झाले होते. आज केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईचा आगडोंब उडाला आहे. पेट्रोल, डिझेल व इतर जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याविरोधात गुरुवारी सकाळी बिंदू चौकात डाव्यांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘शेकाप’चे शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी केले आहे.
राष्ट्रवादी भटक्या सेलची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती, जमाती सेलची गुरुवारी दुपारी बारा वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असून, सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांनी केले आहे.