इचलकरंजी : येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. प्रकाश सातपुते यांनी क्लबच्या कार्याची माहिती दिली. विलास पाडळे यांनी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सुजाता कोईक यांनी मार्गदर्शन केले. शिवबसू खोत यांनी स्वागत केले. यावेळी गजानन शिरगुरे, बाळासाहेब देवनाळ, एम. के. कांबळे, गजानन सुलतानपुरे, महादेवी खोत, प्राजक्ता होगाडे आदी उपस्थित होते. हेमल सुलतानपुरे यांनी आभार मानले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एम. डी. पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले. आर. बी. परीट यांनी दाभोलकर यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली. यावेळी व्ही. सी. फाटक, एस. ए. उत्तूरकर आदी उपस्थित होते.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
इचलकरंजी : अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिष्यवृत्तीसह सप्टेंबरपासून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती सुरू होणार आहे. इयत्ता नववी ते बारावी अल्पसंख्यांक मुलींसाठी ही शिष्यवृत्ती असणार आहे. ऑरनलाईन अर्ज करण्याची सुविधा चाँदतारा मस्जिद येथे दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत केली आहे.