जयसिंगपूर : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने जयसिंगपूर शाखेचे शाखा सल्लागार विद्यासागर आडगाणे यांची जयसिंगपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जवाहर छाबडा यांच्या हस्ते आडगाणे यांचा सत्कार झाला. यावेळी सुकुमार देवमोरे, जगदीश जोशी, सुदर्शन कदम, महेंद्रसिंग रजपूत, शंकर बजाज, दीपक हिंगमिरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
--------------
प्रभारी प्राचार्यपदी धनंजय कर्णिक
जयसिंगपूर : येथील घोडावत कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. धनंजय कर्णिक यांची नियुक्ती केली. कर्णिक हे भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
-----------------------
अमितकुमार सुतार यांचे यश
कुरुंदवाड : येथील डॉ. अमितकुमार सुतार यांनी आधुनिक औषध शास्त्रातील वैद्यकीय पदवी परीक्षेत यश मिळविले आहे. नाशिक विद्यापीठाकडून मिरज शासकीय महाविद्यालयाने २०१९ साली या परीक्षा घेतल्या होत्या. डॉ. सुतार खासगी वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत काम केले होते.
फोटो - ०३०९२०२१-जेएवाय-०१-डॉ. अमितकुमार सुतार
-----------------
जयसिंगपूर महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी सुरत मांजरे
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. सुरत मांजरे यांची निवड केली. सन १९८८ सालापासून डॉ. मांजरे हे महाविद्यालयात ज्ञानार्जनाचे काम करतात. उपप्राचार्य पदाचा कार्यभारदेखील त्यांनी स्वीकारला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे काम सुरू आहे. व्यवस्थापन समितीने त्यांच्यावर प्रभारी प्राचार्यपदी जबाबदारी सोपविली आहे.
फोटो - ०३०९२०२१-जेएवाय-०२-डॉ.सुरत मांजरे