शिरोळ : श्रीनगर (काश्मीर) येथे ९ ते १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आईसस्टॉक स्पधेर्साठी शिरोळ येथील स्वप्नील लाटे याची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. स्वप्नील याने खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून त्या स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवले होते. त्याला भैय्या महेश राठोड व सचिव अजय सर्वोदय यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - ०५०९२०२१-जेएवाय-०३-स्वप्नील लाटे
----------------
कार्यशाळा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल : मुजावर
शिरोळ : विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब आप हेरिटेज शिरोळ आणि पद्माराजे विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेली आलेली मार्गदर्शन कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या बालकल्याण समितीच्या सदस्य ॲड. दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केला. पद्माराजे विद्यालय येथे कार्यशाळा पार पडली. यावेळी संजय शिंदे, तुकाराम पाटील, काशिनाथ भोसले, डॉ. अरविंद माने, डॉ. अतुल पाटील, सुचितकुमार माने उपस्थित होते.
---------------------
आचार्य शांताराम गरुड यांना अभिवादन
जयसिंगपूर : समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर व शिरोळ तालुका पुरोगामी संघटनेच्यावतीने आचार्य शांताराम गरुड यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रारंभी अशोक शिरगुप्पे, प्रा. ए. एस. पाटील, डॉ. चिदानंद आवळेकर, प्राचार्य वाय. एम. चव्हाण यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. तुषार घाटगे, खंडेराव हेरवाडे, ॲड. संभाजी जाधव, डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
--------------------
उदगावात संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
उदगाव : श्री संत सेना महाराज यांनी समाजाला एकत्र आणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृतीचे काम आयुष्यभर केले, असे प्रतिपादन महादेव माने यांनी केले. नरवीर वीर शिवा काशीद तरुण मंडळाच्यावतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रतिमा पूजन व धार्मिक कार्यक्रम करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंदार माने, प्रशांत माने, सतीश माने, नागेश माने, विनोदकुमार माने, विशाल माने उपस्थित होते.