इचलकरंजी : येथील श्री बसवेश्वर नागरी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी दिली. संस्थेचे भागभांडवल दोन कोटी ५२ लाख रुपयांचे असून, ठेवी दहा कोटी ७१ लाख रुपयांच्या आहेत. संस्थेची थकबाकी ३.७८ टक्के आहे. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब देवनाळ, विजयकुमार हावळे, मलगोंडा पाटील, अरविंद चंदुरे, अशोक चनविरे, सुरेखा दत्तवाडे, सरस्वती माळी, आदी उपस्थित होते.
..........
नीलेश पोवार याची निवड
इचलकरंजी : येथील वडार समाजातील नीलेश पोवार याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. या यशाबद्दल समाजाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद पोवार व नरसिंह पारीक यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी महावीर कुरुंदवाडे, प्रमोद पोवार, अनिल कदम, रमेश पाटील, मारुती कोरवी, राजू भडंगे, आदी उपस्थित होते.