दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथे कमी प्रमाणात लसी उपलब्ध होत असल्यामुळे रांगेतूनच काहींना लसीविना परत जावे लागत आहे, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे आदल्या दिवशी आलेल्या ग्रामस्थांची यादी तयार करून त्याबाबत प्रशासनाकडून नियोजन होणे गरजेचे आहे.
-----------------------
दानोळीमध्ये कोविड सेंटर सुरू
दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या ठिकाणी कोविड सेंटर करण्यात आले आहे. लोकवर्गणी व जि. प. सदस्या शुभांगी शिंदे यांच्या प्रयत्नांतून हे सेंटर सुरू झाले आहे. या सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. २५ बेडचे ऑक्सिजनयुक्त हे सेंटर रुग्णांना आधार ठरत आहे.
-----------------------
उदगावमध्ये आज रक्तदान शिबिर
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यातच एक मे पासून १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरू होत असल्याने रक्तदान करण्यास येणारा अडथळा लक्षात घेऊन महादेवी व्यायाम मंडळाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन स्वरूप शिंदे यांनी केले आहे.