इचलकरंजी : कोरोना काळात लोकप्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडत केलेल्या कार्याची दखल घेत आम्ही इचलकरंजीकर क्षत्रिय मराठा संघटनेने आ. प्रकाश आवाडे यांना मानपत्र प्रदान केले. गतवर्षीपासून आ. आवाडे यांनी हजारो नागरिकांना अत्यावश्यक सेवा व शहरातील प्रत्येक भागात औषध फवारणी केली. याची दखल घेत हे मानपत्र दिले. यावेळी जि.प. सदस्य राहुल आवाडे, संजय आरेकर, किशोर निंबाळकर, स्वप्नील पाटील, उमेश गोरे, आदी उपस्थित होते.
..........
इम्युनिटी बूस्टर औषध किट वाटप
इचलकरंजी : कोरोना काळात पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे याची दक्षता म्हणून जिल्ह्यातील पोलिसांसाठी इचलकरंजी मुस्लीम समाजाकडून इम्युनिटी बूस्टर औषध किट देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे हे किट सुपुर्द केले. यावेळी कैश बागवान, अजीज खान, तौफिक मुजावर, समीर शेख, कुदबुद्दीन मोमीन, आदी उपस्थित होते.