नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पाच दिवसांचा कडक जनता कर्फ्यू ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे. शनिवारपर्यंत हा कर्फ्यू लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याबाबत आवाहन केले आहे, तर दूध संकलन सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी एक तास सुरू राहणार आहे.
------------------
साहित्याचे वाटप
जयसिंगपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जयसिंगपूर पोलिसांसह पालिका प्रशासन, वैद्यकीय विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकरिता दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उद्योजक रौनक घोडावत यांनी मास्क व मिनरल वॉटरचे वाटप केले. यावेळी मास्क व मिनरल वॉटर देण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक टकले यांच्यासह पोलीस कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
फोटो - ०५०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
जयसिंगपूर येथे पोलीस ठाण्यात दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उद्योजक रौनक घोडावत यांनी मास्क व मिनरल वॉटरचे वाटप केले.
-----------------
वाहतुकीची कोंडी
नृसिंहवाडी : येथील शिरोळकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.