इचलकरंजी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील रवी रजपुते फाउंडेशनने माणुसकी फाउंडेशन व धर्म माणसुकीचा फाउंडेशन या संस्थांना प्रत्येकी १०० किलो तांदूळ दिले. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते होते. सुरुवातीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विकास जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी रवी जावळे, प्रकाश गोसावी, गजानन शिरगावे, इम्रान शेख, राजू माळी, आदी उपस्थित होते.
अंत्योदय योजनेचे धान्य वाटप
इचलकरंजी : शहरात कोरोना काळात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका १० किलो तांदूळ व २५ किलो गहू, तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत वाटप सुरू झाले आहे. शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरवठा अधिकाऱ्यांनी केले.
रिक्षा सॅनिटाइज मोहिमेस प्रारंभ
इचलकरंजी : आम आदमीच्या वतीने शहरातील रिक्षा सॅनिटाइज करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून या मोहिमेचा प्रारंभ वाहतूक शाखेचे सुरेश ठाणेकर, हिंदुराव चरापले यांनी केला. यावेळी जीवन कोळी, लियाकत गोलंदाज, शरीफ तांबोळी, संदीप उगळे, आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास प्रतिसाद
इचलकरंजी : श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान शहापूर विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने हे शिबिर घेण्यात आले होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शिबिरात १५० जणांनी रक्तदान केले. यावेळी गजानन महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.