गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथे संत गजानन महाराज पॅरामेडिकल कॉलेजतर्फे ७५० कुटुंबीयांतील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ऑक्सिजन पातळी, ताप व रक्तदाब तपासणी करून उपचाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरूले, पोलीस पाटील रेणुका परीट, प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, अरूण हरळीकर, शिरीष हरळीकर आदी उपस्थित होते.
-----------------------
२) कालकुंद्रीतील अलगीकरण केंद्रास पाच बेड भेट
गडहिंग्लज : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर अखंड हरिनाम सप्ताह समितीतर्फे प्राथमिक शाळेतील अलगीकरण केंद्राला ५ बेड भेट देण्यात आले. यावेळी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते एम. जे. पाटील, सप्ताह समितीचे अध्यक्ष शंकर पाटील, यल्लाप्पा पाटील, पुंडलिक जोशी आदी उपस्थित होते.
-----------------------
३) गडहिंग्लजमध्ये काढ्याचे वाटप
गडहिंग्लज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे फ्रंटलाईन वर्करसाठी आयुर्वेदिक काढ्याचे मोफत वाटप करण्यात आले. नगरपालिकेचे स्वच्छता कामगार व आरोग्यसेवक यांच्यासाठी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे काढ्याची पाकिटे सुपूर्द करण्यात आली. यावेळी संघाचे कार्यवाह योगेश शहा, डॉ. संतोष पेडणेकर, राहुल शिंदे, सचिन घुगरी, बिंदू रिंगणे आदी उपस्थित होते.
----------------------
-
४) महागोंडमध्ये गोळ्या वाटप
गडहिंग्लज : महागोंड (ता. आजरा) येथील डॉ. सुधीर यशवंत देसाई यांनी आपला मुलगा दिवंगत सिद्धू याच्या स्मरणार्थ गावातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे मोफत वाटप केले. यावेळी ग्रामसेवक मारुती दोरूगडे, संजय देसाई, जितेंद्र देसाई, जयसिंग देसाई, तानाजी पाटील, यशवंत देसाई, सदानंद पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------
५) कुदनूर रस्ता दुरुस्तीची मागणी
गडहिंग्लज : चंदगड तालुक्यातील कुदनूर परिसरातील हंदिगनूर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जनतेची मागणी आहे. एका खासगी कंपनीच्या केबलसाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसांमुळे रस्त्यावर चिखल झाल्यामुळे वाहनधारकांची कुचंबणा होत आहे.
-----------------------
६) नेसरी परिसरातील वाहनधारकांना आवाहन
नेसरी : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात नेसरी पोलिसांनी जप्त केलेली वाहने आज, मंगळवारी सकाळी १० ते ११ या वेळेत परत करण्यात येणार आहेत. संबंधित वाहनधारकांनी येताना वाहनांची कागदपत्रे सोबत घेऊन यावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी केले आहे.