जयसिंगपूर : येथील जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज ते केपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे. या परिसरात औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरी जाणाऱ्या कामगारांची संख्यादेखील जास्त असते. पथदिवे नसल्यामुळे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
--------------------
ग्रामीण भागात लसीकरणास वेग
शिरोळ : तालुक्यात मंगळवारी लसीकरणास वेग आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसी उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना लस देण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर लस आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
-------------------
रस्ता डांबरीकरण करा
शिरोळ : नांदणी ते शिरढोण मार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. या मार्गावर पॅचवर्क करण्यात आले असलेतरी पूर्णत: या रस्त्याचे फेरडांबरीकरण करण्याची गरज आहे. या मार्गावरुन मोठी वाहतुक देखील होत असते. त्यामुळे रस्त्यावर पक्के डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीस सोईस्कर करावा, अशी मागणी होत आहे.